पुणे येथील हाजन नौशाद इस्माईल बागवान यांचे निधन…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
पुणे महानगर पालिकेचे दिवंगत नगरसेवक इस्माईल अमीरसाब बागवान यांच्या सुविद्य पत्नी हाजन नौशाद इस्माईल बागवान यांचे आज रमजान महिन्याच्या 27 व्या रोजा (उपवास) दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले,मृत्यू समयी त्या 72 वर्षाच्या होत्या…
त्यांच्या मागे दोन मुले,एक मुलगी,सूना,नातवंडे असा मोठा परिवार असुन त्या इंदापूर चे माजी नगरसेवक आणि बागवान समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व राहिलेले स्व अकबरभाई मन्सूरभाई बागवान यांच्या “कन्या” होत्या तर पुणे बागवान समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष जावेदभाई बागवान यांच्या त्या “मातोश्री” होत्या…
अत्यंत मन मिळावू स्वभावाच्या हाजन नौशाद इस्माईल बागवान यांच्यावर पुणे येथील मोमीनपूरा कब्रस्तान येथे अंत्य संस्कार कऱण्यात आले,या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी,पाहुणे रावळे यांच्या सह पुणे शहर बागवान समाज सेवा संस्थेचे बहुतांश सदस्य उपस्थित होते…
अकलूज येथील ज्येष्ठ रंगकर्मी स्व युसुफ मोहोळकर यांच्या त्या “मावशी” तर प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक हाजी जहांगीर शेठ चौधरी यांच्या त्या “आत्या” होत,त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वच क्षेत्रातील मान्यवर लोकांनी हळहळ व्यक्त केली…



