माळशिरसमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ८,७०६ नागरिकांना मिळाला थेट शासकीय लाभ! महसूल दिनाचे औचित्य आ उत्तमराव जानकर व उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांची प्रमुख उपस्थिती

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
माळशिरस : महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार, मा. मुख्यमंत्री महोदय यांचा वाढदिवस व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीचे औचित्य साधून माळशिरस येथील अक्षता मंगल कार्यालय येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” व “गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” कार्यक्रमांतर्गत ‘महसूल दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील तब्बल ८,७०६ नागरिकांना विविध शासकीय सेवा व दाखल्यांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.

विविध विभागांमार्फत मिळालेल्या लाभाचा तपशील
१ उपविभागीय अधिकारी कार्यालय, अकलूज जातीचे दाखले (७९०) व नॉन-क्रिमीलेअर (१४९).लाभार्थी संख्या ९३९
२ तहसील कार्यालय, माळशिरसउत्पन्न (९०२), अधिवास (२२३), EWS (४७), इतर दाखले (६३), संजय/इंदिरा गांधी योजना (६०२), नैसर्गिक आपत्ती e-KYC (४०२), पुरवठा/रेशनकार्ड (१५१३), ७/१२ दुरुस्ती (८९२). लाभार्थी संख्या ४,६४२
३ तालुका कृषी अधिकारी कार्यालयमहाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्वारे लाभ वाटप. लाभार्थी संख्या ९६०
४ पंचायत समिती, माळशिरसघरकुल / वास्तव्य व इतर योजना. लाभार्थी संख्या १,७६५
५ महिला आर्थिक विकास महामंडळमहिला बचत गट सहाय्य. लाभार्थी संख्या १०
६ परिवहन महामंडळ (MSRTC)एनएमसी (NMC) कार्ड. लाभार्थी संख्या ५०
७ नगरविकास विभागघरकुल व इतर योजना.लाभार्थी संख्या ७८
८ उप अधीक्षक भूमी अभिलेख, माळशिरससनद वाटप व मोजणीचे ‘क’ पत्रक. लाभार्थी संख्या ९०
९ वन विभागवन विभागाशी संबंधित कामकाज.लाभार्थी संख्या १७
१० इतर सर्व विभागइतर विविध शासकीय सेवा व दाखले. लाभार्थी संख्या १५३
[ ] –एकूण लाभार्थीसर्वसमावेशक एकूण लाभ ८,७०६

या शिबिरादरम्यान अधिकारी, कर्मचारी व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच माळशिरस तालुक्यात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात (Special Intensive Revision) उत्तम काम करणाऱ्या B.L.O., बी.एल.ओ. पर्यवेक्षक व बी.एल.ओ. सहाय्यकांचा विशेष गौरव व सन्मान करण्यात आला. यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, संजय गांधी योजनेची मंजुरी पत्रे व विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
आमदार उत्तमरावजी जानकर यांनी शिबिराच्या उत्तम आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले व जास्तीत जास्त नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
उपविभागीय अधिकारी सौ. विजया पांगारकर यांनी महसूल विभागामार्फत मिळणाऱ्या विविध गतिमान सेवांची माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ, पं. स. सभापती दत्तात्रय मगर, उपसभापती सौ. मनीषा पाटील, जि. प. सदस्या सौ. मीनाक्षी सरतापे, लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर, पं. स. सदस्य आनंदराव शेंडगे, युवराज झंजे, नम्रता पुकळे, तनुजा खिलारे, महादेव साबळे, नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण, नगरसेवक कैलास वामन यांसह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



