महाराष्ट्र

सोलापूर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला कल्याणी – बागवान परिवाराचा विवाह सोहळा…

आमीर मोहोळकर प्रतिनिधी टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

✅ ऑल इंडिया ओबीसी संघटनेचे राजू मोहोळकर आणि अकलूज येथील पत्रकार आमीर मोहोळकर यांची प्रमुख उपस्थिती…

सोलापूर येथील स्व मैनोद्दीन कल्याणी यांचे सुपुत्र “ताहेर” आणि इरफानभाई बागवान यांची कंन्या “जस्मिन” यांचा विवाह सोहळा मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे किडवाई चौक,येथील “मर्कज” मध्ये पार पडला…

वधू वरांना शुभेच्छा देण्यासाठी सोलापूर शहरातील नामवंत मंडळींसह सर्वच क्षेत्रातील अनेक दिग्गज लोक आवर्जून उपस्थित होते,या वेळी अकलूजहून आलेले ऑल इंडिया ओबीसी संघटनेचे राजू मोहोळकर आणि पत्रकार आमीर मोहोळकर यांचे जोरदार स्वागत “कल्याणी” परिवारातील सर्वच सदस्यांनी केले…

सिद्धेश्वर मार्केट यार्ड,सोलापूर येथील लाल मिरचीचे सुप्रसिद्ध व्यापारी तौफिकभाई कल्याणी यांनी ऑल इंडिया ओबीसी संघटनेचे राजू मोहोळकर यांचा यथोचित सन्मान केला तर सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्टच्या “लवाद समिती” चे हाजी जिलानीभाई कल्याणी यांनी पत्रकार आमीर मोहोळकर यांचा सत्कार केला…

सदरच्या शुभ विवाह प्रसंगी स्व मैनोद्दीन कल्याणी यांचे बंधू गौसभाई कल्याणी,हमीद कल्याणी,समद कल्याणी तर पुतणे मुबीन कल्याणी,अब्रार कल्याणी यांच्या सह “कल्याणी” परिवारातील सर्वच सदस्यांनी आलेल्या पाहुणे रावळ्याचे जोरदार स्वागत केले…

या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र,कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश येथील नामवंत व्यापारी मंडळीसह सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्ट चे लवाद समिती सदस्य आणि संचालक मंडळातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते…

सदरच्या विवाह सोहळ्या नंतर सोलापूरच्या पोलीस मुख्यालया समोर असलेल्या “अचिव्हर हॉल” येथे आलेल्या सर्व लोकांची जेवणाची सोय करण्यात आली होती,हा विवाह सोहळा यशस्वी रित्या पार पडण्यासाठी कल्याणी – बागवान परिवारातील सर्वच सदस्यां कडून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button