शहर

पालघर जिल्ह्यातील केळवा बीच दर्या निवास रिसॉर्ट मध्ये विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील केळवा बीच येथील एका रिसॉर्ट मध्ये विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
ही महिला केळवा बीच येथे आपल्या प्रियकरा सोबत शुक्रवारी सकाळी 11.30 फिरण्यासाठी आली असताना ही घटना घडली आहे.

प्रियंका पवार वय वर्ष( 27 ) असे या विवाहित महिलेचे नाव असून ती विरार आगाशी येथील रहिवासी आहे. ती आपल्या प्रियकरा सोबत शुक्रवार दिनांक 23 मे 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील केळवा बीच येथे फिरण्यासाठी आली होती.

प्रियंका आपल्या प्रियकरा सोबत दर्या निवास या रिसॉर्ट मध्ये थांबली असताना या दोघांनी खाण्यासाठी चायनीज चिकन आणि थंड पेय थम्सअप मागवला होता. हे खाद्य खात असताना तिला ठसका लागून ती खाली पडल्यावर ती उठत नव्हती म्हणून तिच्या प्रियकराने पोलिसांना याबाबत वर्दी दिल्यावर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून याबाबत केळवा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

या महिलेला एक 7 वर्षाची मुलगी आहे.
या घटनेबाबत केळवा सागरी पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button