शहर

केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील दातीवरे समुद्रकिनारी सापडला एका पुरुष जातीचा बेवारस मृतदेह

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत एका 40 वर्षीय पुरुष जातीच्या इसमाचा बेवारस मृतदेह केळवा सागरी पोलिसांच्या हाती रविवारी सापडला आहे.

हा इसमपुरुष जातीचा असून अंदाजे त्याचे वय 40 वर्ष असून त्याच्या हातावर S असे अक्षर कोरलेले आहे.रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी हा पुरुष जातीचा बेवारस मुतदेह विहांग रिसॉर्टच्या पाठीमागे दातिवरे गाव समुद्रकिनारी सापडला आहे. हा मृतदेह संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत होता.या बाबत केळवा सागरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button