महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाने घेतली टाइम्स 9 मराठी न्यूजच्या बातमीची दखल…

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

त्याचे झाले असे की,सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाने जिल्हा अध्यक्ष प्रा धनंजय साठे यांच्या नेतृत्वाखाली 29 जुलै 2024 रोजी पंढरपूर येथील के बी पी कॉलेज समोरिल हॉटेल धनश्री येथे दुपारी 1 वाजता प्रदेश अध्यक्ष पंडित कांबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक बोलावली होती,

सदरच्या कार्यक्रम पत्रिकेत “अजातशत्रू” विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची नावे आणि फोटो वगळून कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका काढण्यात आली होती,हि गोष्ट अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कट्टर मोहिते पाटील समर्थक लालासाहेब अडगळे यांच्या नजरेत आल्या नंतर त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डल द्वारे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत त्या घटनेचा जाहीर निषेध केला होता…

या प्रतिक्रियेची दखल टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनल चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांनी प्रकाशित केली होती.टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनेल ने ती बातमी प्रकाशित केल्यानंतर काही तासातच आपली झालेली चुकीची सुधारणा करत जिल्हा सामजिक न्याय विभागाने सदरील कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत “अजातशत्रू” विजयसिंह मोहिते पाटील आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (श प) एकमेव खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे नांव आणि फोटो लावून निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध कऱण्यात आली…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श प) गटाच्या सामाजिक न्याय विभागाने वेळीच दखल घेत “ती” चूक सुधारल्याने मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी टाइम्स 9 मराठी न्यूज वर कौतुकाचा वर्षाव केला…

टीप :- जिथं RISK तिथं टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलची ENTRI FIX हे मात्र तितकेच खरे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button