शहर

पालघर जिल्ह्यातील सफाळे एडवण गावातील एका (70) वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे एडवण गावातील एक (70) वर्षीय महिला आपल्या घरातील साठवून ठेवलेली जळाऊ लाकडे जेवण करण्यासाठी गोणीतून बाहेर काढत असताना या गोणीत असलेल्या एका विषारी सापाने या महिलेच्या हातावर दंश केल्यामुळे तिचा उपचारादरम्यान सोमवारी एडवण ग्रामीण रुग्णालयात संध्याकाळी मृत्यू झाला आहे.

रेखा केशव इंगळे असे या महिलेचे नाव असून ती सफाळे एडवण या गावात राहत होती. तिचे वय (70)वर्ष असून ती सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास दुपारचे जेवण करण्यासाठी घरात एका गोणीत साठवून ठेवलेली सुकी जळाऊलाकडे काढण्यासाठी गेली असताना या गोणीत असलेल्या एका विषारी सापाने तिच्या हातावर दंश केल्यामुळे तिला उपचारासाठी एडवण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान सोमवारी संध्याकाळी पावणेतीन वाजता मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button