शहर
माळीनगर येथील दि मॉडेल विविध अंगी प्रशालेत महात्मा फुले जयंती साजरी

माळीनगर—प्रतिनिधी
रियाज मुलाणी
थोर समाजसेवक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ जयंती माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेत उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा .फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे उपप्राचार्य कल्लाप्पा बिराजदार यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्राचार्य प्रकाश चवरे,पर्यवेक्षक रितेश पांढरे,शिक्षक राजीव देवकर,नामदेव जोशी,बाळासाहेब भोसले, कमलाकर फरताडे,सचिन आतकर,शिक्षिका वैशाली पांढरे,वैशाली बनकर यांनी म.फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी विद्यार्थिनी सोफिया शेख हिने महात्मा फुले यांचे विषयी विचार मांडले तर राजू कांबळे यांनी “महाराष्ट्र मातीचा,वाघाच्या छातीचा, सत्यशोधक तो मर्दाच्या जातीचा” हे गीत सादर केले. भाषण केल्याबद्दल सोफियाला पेन व गुलाब पुष्प देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामहरी वायचळ यांनी केले



