सयाजी राजे मित्र मंडळाच्या शाखेचे “पंचवटी” येथे उद्घाटन…

राजे सयाजी यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त केली भव्य रक्तदान शिबिराची घोषणा…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
आज अकलूज – माळीनगर रोड येथील पंचवटी येथे असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर या भागात सयाजीराजे मित्र मंडळाच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला,या शाखेचे उद्घाटन युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले…

सदर च्या शाखा उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अकलूज च्या सदुभाऊ सांस्कृतिक भवन येथे दिनांक 11/02/2025 रोजी सकाळी 9 : 00 ते दुपारी 4 : 00 या वेळेत भव्य अशा रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाची घोषणा देखील राजे सयाजी यांनी केली…

अगदी थाटामाटात झालेल्या या शाखा उद्घाटन वेळी सयाजी राजे मित्र मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन आणि जल्लोष करत “सयाजी राजे तुम आगे बढो” च्या घोषणा दिल्या…
या वेळी फटाक्यांच्या आतषबाजीने आणि हलगीच्या निनादात सयाजीराजे मोहिते पाटील यांचा सत्कार शाखेचे अध्यक्ष अजिंक्य चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला…

या वेळी उपाध्यक्ष निलेश खाडे,शाखेतील सर्व पदाधिकारी,सदस्य,पंचवटी परिसरातील नागरिक तसेच अकलूज सह विविध भागातील सयाजी राजे मित्र मंडळाच्या शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते…



