09 फेब्रुवारी “ध्येयवादी” लोकांचा जन्म दिवस…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
तसे पहायला गेल्यास रोज कुणाचा न कुणाचा वाढदिवस हा असतोच,पण माझ्या ऑब्जर्वेशन मध्ये आलेली एक तारीख म्हणजे 09 फेब्रुवारी… या दिवशी अनेक “ध्येयवादी” लोकांचा जन्म झाला हे विशेष…
2010 मध्ये “मिस अर्थ” झालेली निकोल फारिया,हिंदी चित्रपट अभिनेत्री अमृता सिंग,ऑस्ट्रेलियाचा महान माजी जलद गती गोलंदाज ग्लेन मॅकग्रा,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले,महाराष्ट्राचे अजून एक माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे,ज्येष्ठ लेखक भाऊ तोरसेकर आणि जुन्या जमान्यातील हिंदी चित्रपटाची अभिनेत्री शोभना समर्थ यांचा जन्म दिवस देखील 09 फेब्रुवारीचाच्…
तर मित्रांनो 09 फेब्रुवारीला जन्म झालेल्या व्यक्तींची एवढी मोठी लिस्ट माझ्या कडे असु शकते तर तशी लिस्ट हि तुमच्या कडे सुध्दा असेल याची मी खात्री बाळगतो,09 फेब्रुवारी या दिवसाचा ऑरा मात्र काही अलगच आहे हे निश्चित…

हा दिवसच जणू “ध्येयवादी” लोकांचा जन्म दिवस आहे असे का वाटू नये…? कारण या दिवशी जन्मलेल्या वरील व्यक्तींनी तर त्यांच्या जीवनात समाजाच्या उन्नती साठी काही न काही काम केलेले आहे,हे माझ्या सहित आपणाला देखील प्रकर्षाने जाणवत असेल…
फेब्रुवारी महिना तसा अनेक “डे” साठी प्रसिद्ध तर आहेच परंतु तो काही असामान्य व्यक्तिमत्वाच्या लोकांच्या “बर्थ डे” साठी सुध्दा प्रसिध्द आहे हे मात्र मला खास करून सांगायचे आहे…
09 फेब्रुवारीला जन्मलेल्या वरील “ध्येयवादी” व्यक्तिमत्वाच्या लिस्ट मध्ये माझ्या नातलगा पैकी स्व हाजी फक्रोद्दिन चौधरी,माझे चुलते रफिकभाई मोहोळकर आणि माझे द ग्रेट जावई शाहिद बागवान देखील आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे…
या सर्वांना माझ्या तर्फे आणि टाइम्स 09 न्यूज तर्फे वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा