माळीनगर मध्ये या वर्षीपासून माता रमाई या पुरस्काराचे वितरण……

प्रतिनिधि – रियाज मुलाणी
मो.9921500780
महात्मा फुले व डॉ, बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ माळीनगर (रामामाता कॉलनी) यांच्यावतीने गेली दोन ते तीन दिवस झाले माळीनगर मध्ये मोठ्या आनंदाच्या वातावरणात व उत्साहामध्ये त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जय भीम पटांगण माळीनगर रमामाता कॉलनी येथे साजरी करण्यात आली, कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 7 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता ध्वजारोहण व माता रमाईच्या प्रतिमेचे पूजन आयु, विद्या संघकीर्ती काटे केंद्रीय शिक्षिका श्रामनेरी सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले.

येथे महिलांसाठी व मुलींसाठी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये संगीत खुर्ची स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच यावर्षी या ठिकाणी कोण होईल रमाईची लेख कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम येथील सर्व महिलांचे आकर्षण ठरला. तसेच माता रमाई जयंती निमित्त माळीनगर मधील सर्व बंधू-भगिनींसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व कार्यक्रमासाठी माळीनगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील बंधू आणि भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
