राष्ट्रीय पँथर्स आघाडी पालघर जिल्ह्याच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
राष्ट्रीय पँथर्स आघाडी पालघर जिल्हा विशेष कार्यकारणीच्या सर्वसाधारण सभेत संघटनेचे सर्वेसर्वा आविश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी जिल्ह्यातील सर्व जिल्हा, तालुका, विभाग, शाखा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, विशेषतः महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी संघटनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनपट , त्याग, समर्पण बलिदान या संपूर्ण जाज्वल इतिहासाला उजाळा दिला. तसेच पालघर जिल्हा कार्यकारणी सोबत सखोल चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णय घेण्यात आले. त्यात राष्ट्रीय पँथर्स आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटना या संघटनेचे नोंदणीचे कार्य आता पूर्ण होत असून, या कामगार संघटनेच्या वतीने कामगारावर होणारे अन्य अत्याचाराला वाचा फोडणे, त्यांना न्याय मिळवून देणे त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रसन्ना नारायण जाधव याची डहाणू तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर उपेंद्र वीरेंद्र राजवंशी यांची पालघर तालुका सहसचिव, श्रीमती रेखा संजय पटेल हिची बोईसर दांडीपाडा विभाग महिला अध्यक्ष पदी तर प्रफुल नारायण केंजळे याची दहिसर विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे सर्वेसर्वा आविश राऊत, संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरशद खान , महासचिव जगदीश राऊत, कोष्याध्यक्ष भरत महाले, संघटनेचे राष्ट्रीय सचिव बिंबेश जाधव, राष्ट्रीय सहसचिव लहानु डोबा, संघटनेचे राष्ट्रीय सदस्य तथा पालघर जिल्हा अध्यक्ष संतोष कांबळे, राष्ट्रीय सदस्य भारतीताई राऊत विद्याताई मोरे, मोहिनीताई जाधव, चंद्रसेन ठाकूर, संयोजक समिती सदस्य शिवप्रसाद कांबळे, संयोजक समिती सदस्य तथा पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष विनायक जाधव, संयोजक समिती सदस्य तथा पालघर जिल्हा संयोजक उमेश कापसे, मरिनाताई रीबेलो, स्नेहाताई जाधव, संयोजक समिती सदस्य तथा आदिवासी प्रदेश अध्यक्ष कमलाकर माळी, संयोजक समिती सदस्य तथा राज्य आदिवासी विभाग अध्यक्ष कमलाकर माळी, लक्ष्मण रखमे, निलेश गायकवाड, संयोजक संमिती अध्यक्ष तथा पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत,महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभाग महिला अध्यक्ष वहिदा ताई शेख, जिल्हा उपाध्यक्ष विंदेश कापसे, अहमद खान, अली हसन, पालघर जिल्हा सचिव रमाकांत गायकवाड, जिभाऊ अहिरे, जिल्हा प्रमुख सल्लागार सदाशिव मोरे, पालघर जिल्हा महिला सचिव शीतल ताई ठाकरे, पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत, डहाणू तालुकाध्यक्ष सिराज शेख, डहाणू तालुका उपाध्यक्ष प्रसन्ना जाधव, पालघर तालुका उपाध्यक्ष अर्जुन बाशिरे, साहेबराव मळे, तालुका सचिव रमेश जोरावर, तालुका सहसचिव देविदास बर्वे, डहाणू तालुका सचिव सुनील भांगे, डहाणू तालुका उपकर्याध्यक्ष सुदाम दामले, पालघर तालुका सदस्य दगडू पवार, बोईसर विभाग कार्यकारणी सदस्य पूजा ताई कांबळे, सफाळे विभाग कार्यकर्ती सुचिता पाटील, डहाणू शहर महिला अध्यक्ष सारिका गुरोडा, चिंचणी शहर महिला अध्यक्ष प्रियंका बाणे, वाणगाव शहर अध्यक्ष सागर राऊत, वाणगाव शहर सचिव कल्पेश खरात, वाणगाव शहर संघटक उमेश पाईकराव, वाणगाव शहर उपाध्यक्ष नितीन नाईक, वाणगाव शहर महिला अध्यक्ष सोनाली जाधव, कापशी शाखा अध्यक्ष गणेश दुबळा, डहाणू तालुका कार्यकारणी कृष्णा शर्मा, स्वाती बारी, सफाळे विभाग उपाध्यक्ष वसंत बोराडे, कार्यकारणी सदस्य सुदाम सर्जेराव, संतोष रूके, सफाळे विभाग कार्यकारणी संगीता बर्वे, अंजना गायकवाड, रिचा कापसे, सफाळे शहर उपाध्यक्ष सतीश शिवगण, बोईसर शहर उपाध्यक्ष संजय पटेल, बोईसर विभाग दांडीपाडा महिला प्रमुख रेखा पटेल, सारणी विभाग महिला अध्यक्ष सुरेखा माळी, सातपाटी विभाग प्रमुख प्रवीण पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.