विशेष

इंदापूर येथे जोशी समाजाच्या न्याय हक्कासाठी
राज्यस्तरीय बैठक संपन्न

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 867 448

राज्यातील भटके विमुक्त जोशी समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यस्तरीय विचार मंथन बैठक इंदापूर जि.पुणे येथील शासकीय विश्रामगृहावर पार पडली.
भटके विमुक्त जोशी समाजाच्या संविधानिक शैक्षणिक राजकीय न्याय हक्कासाठी भटके विमुक्त जोशी समाजासह भटके विमुक्त प्रवर्गातील इतर समाजाला एकत्रित करुन लढा देण्यात येईल
भटके विमुक जोशी समाजासाठी आता पर्यंत शासनाने काय योजना राबवल्या किती अमलात आल्या आरक्षणाचा लाभ खरच होतो का?
जोशी समाजाची सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती या विषयावर चर्चा करण्यात आली.या पार्श्वभूमी वर येत्या काळात जोशी समाजाचा राज्यस्तरीय दसरा मेळावा घेण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून जोशी समाजासह भटके विमुक्तांच्या प्रश्नांची दखल शासन स्तरावर घेतली जाईल .
सदर बैठकीचे आयोजन सुभाष भोसले, जितेंद्र जाधव, किरण धुमाळ ,अरुण धुमाळ, मनीष जाधव ,यांनी केले
या राज्यस्तरीय बैठकीमध्ये प्रा.शिवाजीराव जोशी,, गोपीचंद इंगळे, अनुराधा सरवदे,अशोक पवार,यांच्या सह सोलापूर सातारा पुणे मुंबई विभागातील जोशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button