शहर
इकबाल शिराज शेख यांचे अल्पशा आजाराने निधन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
गट नंबर २( महाळुंग) येथील सामाजिक कार्यकर्ते मंजूर भाई शिराज शेख यांचे बंधू इकबाल सिराज शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले
मृत्यु समयी ते ६३ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना ,नातवंडे, तीन भाऊ, एक बहीण, असा परिवार असून मागील तीन दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता माळीनगर येथील दफनभूमीत त्यांचा दफन विधी करण्यात आला त्यांच्या अंत्यविधीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.



