आलेगाव (बु) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांअभावी रूग्णांची गैरसोय

टेंभुर्णी प्रतिनिधी -नानासाहेब चंदनकर
मो-8208530338
मौजे आलेगाव (बु) ता.माढा जि. सोलापूर येथील आरोग्यवर्धीनी केंद्र आलेगाव (बु) या ठिकाणी कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांची प्रचंड अशी गैरसोय होत आहे. यामध्ये बर्याच प्रमाणात औषधांचा तुटवडा बराच जाणवत आहे. यामध्ये “साखर आजारावरील गोळी, बिपी, ची गोळी अशा प्रकारच्या अनेक औषधांचा तुटवडा भासत आहे. आपल्या या आरोग्य केंद्रामध्ये मंजूर पदे १८असताना देखील ४०/टक्के च पदे रिक्त आहेत.म्हणजे जवळ जवळ ८ कर्मचारी कमी असताना देखील डॉ.गायकवाड एस.के.यांच्या योग्य नियोजना मुळे आरोग्य केंद्राचे कामकाज बर्यापैकी चांगले चाललेले आहे. जो हजर स्टाफ आहे. तो अतिशय काटेकोरपणे वेळेनुसार कामकाज पाहत आहे.
तरीसुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांनी थोडे लक्ष देवून औषधांचा तुटवडा कर्मचाऱ्यांची भरती याकडे पुर्ण लक्ष देवून सहकार्य करावे. अशी आलेगाव (बु) येथील ग्रामस्थांची मनापासून इच्छा आहे.
त्याचप्रमाणे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचाच भैरवनाथ शुगर युनिट ४ आलेगाव (बु )येथे कारखाना असुन त्या साखर कारखान्याचे दुषित पाणी सर्व परिसरामध्ये मोकळे सोडून दिल्यामुळे ते पाणी ओढ्याद्वारे नदीला मिळत आहे त्यामुळे आलेगाव (बु), आलेगाव (खु), रूई, टाकळी ,गारअकोले इत्यादी गावातील मनुष्यांबरोबर प्राण्यांचे ही जिवन धोक्यात आले आहे .यासाठी आरोग्यमंत्री. मा. श्री. तानाजीराव सावंत महाराष्ट्राच्या आरोग्याच्या विकासाऐवजी या कोंढारभागातील जनतेचे आणि जनावरांचे आरोग्य वाचवू शकतील काय? असा प्रश्न कोंढार भागातील जनतेला पडलेला आहे, त्यामुळे सामांन्याचा विचार करून मंत्री महोदयांनी योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा कोंढारभागातील नव्हे तर सर्व माढा तालुक्यातील जनतेच्या रोष्यास सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी.



