वार्डातील नगरसेवक मतदारसंघात अक्षरशः तोंडघशी पडले की पाडले
बी.टी.शिवशरण
महाळुंग श्रीपूर नगरपंचायत चे श्रीपूर भागातील नगरसेवक अक्षरशः मतदारसंघात तोंडघशी पडले आहेत नव्हे नगरपंचायत ने तोंडघशी पाडले आहेत कारण गेल्या वर्षभरात संबंधित नगरसेवक नगरसेविका यांनी मोठ्या आविर्भावात त्यांच्या मतदारसंघात कोणत्या गल्लीत कुठे रस्ता करायचा गटार कशी बांधायची मुरुमीकरण कुठं करायचे सार्वजनिक ठिकाणी पाणीपुरवठा योजना नविन शौचालय समाजमंदिर घरकुल यासाठी ते नगरसेवक स्वतः मतदारसंघात समक्ष फिरून रस्त्यांची माप गटारीचे माप स्वतः मोजणी करून फिरत होते मतदारांना आश्वासन पूर्ण होणार म्हणून आनंद झाला होता
मात्र दिवसांपासून दिवस महिने गेले पावणेदोन वर्षे कालावधी झाला पण त्यांनी ज्या उत्साहाने व आवेशात नगरसेवक म्हणून प्रतिष्ठा व कामाची सुरुवात केली होती ती विकासकामे प्रत्यक्षात होतच नाहीत त्यामुळे मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे वास्तविक पाहता नगरपंचायत कडून नागरिकांच्या सुविधा योजना राबवण्यासाठी नगरपंचायत मार्फत विकासात्मक प्रशासनाची जबाबदारी आहे इथे मात्र नगरपंचायत मध्ये सत्ताधारी व विरोधक यांचेत आरोप प्रत्यारोप व कुरघोड्या सुरू असल्याचे पहायला मिळते दोघांच्या भांडणात विकासाला चालना मिळण्या ऐवजी कामकाज ठप्प होताना निदर्शनास आले आहे नगरपंचायत मध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने त्रिशंकू परिस्थिती मध्ये वैचारिक गोंधळात नगरपंचायतचा कारभाराचा गाडा पुढं काही जात नाही