अकलूज येथे 5 ऑगस्ट रोजी महिला आरोग्य व हाडांची ठिसूळता तपासणी शिबीर
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज : फडे नर्सिंग होम अकलूज, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रा. लि. सातारा व रोटरी क्लब सराटी डिलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत फडे नर्सिंग होम, अकलूज येथे महिला आरोग्य व हाडांची ठिसूळता तपासणी शिबीराचे आयोजन केल्याची माहिती फडे नर्सिंग होम चे डॉ.सुभाष फडे, डॉ.किरण फडे व डॉ.तृप्ती फडे यांनी दिली.
या शिबीरामध्ये महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या, अतिरक्तस्त्राव, अनियमित पाळी, अंगावरचे पांढरे जाणे, पोटदुखी, एच.बी. तपासणी, अंगबाहेर येणे, वंध्यत्व चिकित्सा व मार्गदर्शन, गर्भाशय पिशवीची तपासणी, गरोदर स्त्रियांची तपासणी, मासिक पाळीत वापरण्यासाठी कप इ. आजारांची स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबीरात तपासणी केलेल्या गर्भवती स्त्रियांची पुढील प्रसुतीपुर्व तपासणी सवलतीच्या दरात केली जाईल. शिबीरात तपासणी केलेल्या रुग्णांना पुढील उपचारामध्ये किंवा शस्त्रक्रियेमधील फी मध्ये सवलत दिली जाईल.
तसेच या शिबीरामध्ये हाडांची ठिसूळता तपासणी ऑस्टिओपोरोसिस मशीनवर व बॉडी ॲनालायझर मशीनवर वजन, बीएमआय, बॉडी फॅट, हायड्रेशन, मसल, मास, बोन मास, बीएमआर, स्केलेटल मसल, प्रोटीन, मोटॅबोलीक एज इ. तपासण्या माफक दरात करण्यात येणार आहेत. यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क 8087145732 / 02185 – 223552.