महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जागतिक पातळीवरील महान साहित्यिक होते —व्याख्याते,चंद्रशेखर गायकवाड

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.—-97 30 867 448

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगातील 22 भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे चित्रा ,सुलतान ,फकीरा, वारणेचा वाघ, अग्निदिव्य, या कादंबऱ्या घराघरात पोहोचले आहेत भारत देशातील सर्व प्रादेशिक भाषांमध्ये अण्णा भाऊंचे साहित्य अनुवादित झाले आहेत अण्णाभाऊ साठे यांनी 40 कादंबऱ्या ,15 पोवाडे 23 कथासंग्रह ,10 लोकनाट्य , 1 प्रवास वर्णन , 1नाटक ,10 लोकनाट्य, लिहून मराठी साहित्याचे वैभव वाढवले आहे प्रा.विद्या पंडित –शरद पाटील म्हणतात “अण्णाभाऊंची तुलना जगात फक्त रशियातील श्रेष्ठ साहित्यिक कादंबरीकार दोस्तो एवस्की यांच्याशी होऊ शकते”

अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्र आणि भारत या चौकटीमध्ये मावणारे लहान व्यक्ती नसून ते जागतिक पातळीवरील महान व्यक्तिमत्व आहे त्यामुळे जीवनाच्या अखेरपर्यंत झुंजणारे “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे” या पुस्तकात मी महाराष्ट्र शासनाला विनंती केली आहे “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे” यांना “ज्ञानपीठ पुरस्कार “जाहीर केला पाहिजे भारताची सीमा ओलांडून महाराष्ट्राचे नाव उंच करणाऱ्या साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना “ज्ञानपीठ पुरस्कार” दिला गेला पाहिजे

असे विचार साहित्यिक व व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड ,यांनी महाळुंग ता. माळशिरस जि. सोलापूर येथे व्याख्यान देताना व्यक्त केले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती महाळुंग यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच– शिवतेजसिंह मोहिते पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिकंदर शेख हे उपस्थित होते याप्रसंगी नगराध्यक्षा अर्चनाताई चव्हाण नगरसेवक -रावसाहेब सावंत पाटील, डॉक्टर लाटे, शामराव भोसले ,सोमनाथ मुंडफणे, बंडू कोकीळ, जि. प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक साठे सर, शारदा लोखंडे, भोसले मॅडम ,पत्रकार –श्रीनिवास कदम पाटील ,तानाजी साठे, तसेच महाळूंग मधील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले तसेच त्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तर नगरअध्यक्ष अर्चनाताई चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

पाऊस पडत असताना सुद्धा महाळुंग मधील नागरिकांनी एकाग्रपणे व्याख्यान ऐकले आणि व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड म्हणाले की जयंती उत्सव समितीने रक्तदान शिबिर वृक्षारोपण वह्या वाटप व समाज प्रबोधन पर कार्यक्रम तसेच अन्नदानाचे नियोजन करून जयंती समिती महापुरुषाचे विचार जगत असून हा एक फार मोठा आदर्श आहे याप्रसंगी श्रीपुर बोरगाव महाळुंग मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button