माळशिरस तालुक्यात आनंदनगर येथे महसुलदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
उपसंपादक ——हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.——97 30 867 448
महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वाये माळशिरस तालुक्यात महसुल सप्ताहाचे उद्घाटन प्रांताधिकारी नामदेव टिळेकर व तहसिलदार सुरेश शेजुळे यांचे शुभहस्ते करण्यात आला.
या महसुलदिनानिमित्त माळशिरस ,अकलूज ,शंकरनगर, आनंदनगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. शंकरनगर-अकलूज मध्ये तलाठी कार्यालयात युवा संवाद कार्यक्रमात सो.जि.प.मा.अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते युवकांना दाखले वाटप करणेत आले.आनंदनगर येथे कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन अकलूज विभागाचे मंडलाधिकारी भोसले व तलाठी बांधवांनी केलेले आहे. शासनाच्या महसुल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा गौरव करुन सत्कार करण्यासाठी शासनाने महसुल सप्ताह राबविण्याचे आदेश दिलेले आहे. सोलापूर जिल्हा स्तरावर याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करणेत आलेले आहे. महसुल सप्ताह मध्ये युवासंवाद,जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसुल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी , कर्मचारी संवाद , तसेच ७ आॕगस्ट रोजी सप्ताहाचा सांगता समारंभ होणार आहे. तरी जनतेने या महसुल सप्ताह मध्ये तालुक्यातील विविध गावामध्ये राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा जास्तीतजास्त लाभ घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी नामदेव टिळेकर यांनी केले आहे.