महाराष्ट्र

मणिपूर सरकारच्या आणि संभाजी भिडे च्या विरोधात शुक्रवारी बहुजन संघर्ष सेना करणार तहसील कचेरी समोर निदर्शने

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

: मणिपूर मधील हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरलेले बिरेन सिंह सरकार बरखास्त करा व राष्ट्रपती राजवट लागू करा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूर येथील हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरल्याने अमित शहा यांचा राजीनामा घ्या .

भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल व महात्मा गांधी, महात्मा फुले, इतर महामानवाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने देशद्रोही मनोहर उर्फ संभाजी भिडे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी बहुजन संघर्ष सेना करमाळा तहसील कचेरी समोर 4 ऑगस्ट शुक्रवार रोजी ठीक ११:०० वाजता बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करणार आहे याची माहिती बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा सचिव आप्पा भोसले यांनी दिली आहे लोकशाही व संविधानावर्ति प्रेम करणाऱ्या सर्व नागरिक कार्यकर्त्यांनी उपस्तित राहवे असे आवाहन अपा भोसले यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button