दगडातून मूर्तीमध्ये परावर्तित व्हायचे असेल तर छन्नी हातोडीचे घाव सहन करावे लागतात— अकलूजचे उपविभागीय अधिकारी – नामदेव टिळेकर
माळीनगर.. प्रतिनिधी रियाज मुलाणी, मो 9921500780
दगडातून मूर्तीमध्ये परावर्तित व्हायचे असेल तर काही दिवस छन्नी हातोडीचे घाव सहन करावे लागतील असे प्रतिपादन अकलूज उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने चालू वर्षापासून १ ते ७ ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह दिवस साजरे करण्याचे आयोजित केले होते त्या अनुषंगाने ७दिवस विविध उपक्रम राबवून हा महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे
त्या अनुषंगाने २ ऑगस्ट रोजी उपक्रम क्रमांक २ युवा संवाद या विषयावर ते बोलत होते. त्या अनुषंगाने महसूल विभाग जिल्हाधिकारी सोलापूर मधील माळशिरस तहसील कार्यालय मार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत, अकलूज येथील ज्ञानअकॅडमी, व ॲग्रिकल्चर कॉलेज अकलूज, येथील” युवा संवाद ” या विषयावर युवकांशी संवाद साधताना माळशिरस उपविभागीय –अधिकारी नामदेव टिळेकर यांनी युवकांनी आपले उच्च ध्येय गाठण्यासाठी पूर्ण पेटून उठले पाहिजे व अपार कष्ट करणे करणे गरजेचे आहे
प्रथम आपणास काय करायचे हे निश्चित करा परिस्थिती कशी असो तिचा ऊहापोह करीत बसू नका आपल्या ध्येयावरती फोकस करा जर तुमची इच्छाशक्ती दृढ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आपण फक्त आपल्या अडचणी सांगत असतो जर तुम्हास इथे यश मिळवायचे असेल तर अडचणी कडे न पाहता याच्यावर मार्ग काढून त्याच्यावर मात कशी करावी याच्यावर भर द्यावा थोडा त्रास होईल परंतु त्रास सहन केला तर कालांतराने तुमचे उच्चपदस्थ स्थान प्राप्त होईल तरच तुमचे जीवन सफल होईल सर्वांनी सामूहिक रित्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा तुमचे ध्येय साध्य होईपर्यंत मोबाईल ला हात लावू नका इतर सर्व गोष्टी परत मिळविता येतात परंतु एकदा गेलेली वेळ परत येऊ शकत नाही, स्वतःमध्ये बदल करा स्पर्धा दुसऱ्याशी न करता स्वतःशी करायला शिका, असे आव्हान युवा पिढीला केले.
प्रारंभी माळशिरस तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी महसूल सप्ताह विषयी मार्गदर्शन केले आणि विविध दाखल्याविषयी येणाऱ्या अडचणी संदर्भात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले,
या महसूल दिनानिमित्त प्रथम दिवस --"महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ ", दुसरा दिवस-" युवा संवाद," तिसरा दिवस-- "एक हात मदतीचा," चौथा दिवस--" जनसंवाद ", पाचवा दिवस-- "सैनिक हो तुमच्यासाठी", सहावा दिवस --महसूल संवर्गातील कार्यरत /सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी संवाद,/ सातवा दिवस-- "महसूल सप्ताह समारंभ "आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यशवंतनगर तलाठी कार्यालयात विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, यांच्या हस्ते उपस्थित अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला तसेच याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार- अमोल कदम, निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण सुळ, अकलूजचे मंडल अधिकारी-- चंद्रकांत भोसले, तलाठी- किसन शिंदे, नवनाथ मोरे, गणेश भानवसे, संजय माने, श्रीमती निकम मॅडम व कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते