तांबेवाडी तालुका माळशिरस येथे महसूल सप्ताह निमित्त “एक हात मदतीचा “या उपक्रमात बाबत मार्गदर्शन
उपसंपादक–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.—– 97 30 867 448
महाराष्ट्र शासनाच्या वतीने चालू वर्षापासून १ ते ७ ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह दिवस साजरे करण्याचे आयोजित केले होते त्या अनुषंगाने ७दिवस विविध उपक्रम राबवून हा महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे . त्या अनुषंगाने महसूल विभाग जिल्हाधिकारी सोलापूर मधील माळशिरस तहसील कार्यालय मार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत,
प्रारंभी माळशिरस तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी महसूल सप्ताह विषयी मार्गदर्शन केले आणि विविध दाखल्याविषयी येणाऱ्या अडचणी संदर्भात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले,
या महसूल दिनानिमित्त प्रथम दिवस –“महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ “, दुसरा दिवस-” युवा संवाद,” तिसरा दिवस– “एक हात मदतीचा,” चौथा दिवस–” जनसंवाद “, पाचवा दिवस– “सैनिक हो तुमच्यासाठी”, सहावा दिवस –महसूल संवर्गातील कार्यरत /सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी संवाद,/ सातवा दिवस– “महसूल सप्ताह समारंभ “आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे
त्या अनुषंगाने 3 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह निमित्त एक हात मदतीचा या उपक्रमानिमित्त तांबेवाडी ग्रामपंचायत येथे माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ मंडलाधिकारी लोखंडे साहेब यांनी तांबेवाडी येथे उपस्थित राहून ग्रामस्थांना या महसूल सप्ताहाची व विविध योजनांची ग्रामस्थांना माहिती दिली