महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये कर्मचार्यांना दहा महिन्यांपासून वेतन नाही
बी.टी.शिवशरण
महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये येथील कर्मचारी गेल्या दहा महिन्यांपासून त्यांच्या वेतनापासून वंचित आहेत दहा महिने वेतन नसल्याने त्यांची उपासमार होत आहे अनेक जण उधार उसनवारी करून कसे तरी दिवस ढकलत आहेत बहुतांश कर्मचारी हे मागासवर्गीय समाजातील आहेत त्यांच्या घरातील विद्यार्थी वृध्द आईवडील यांचे शाळा दवाखाना खर्चासाठी अडचणी येत आहेत दहा महिने वेतन होत नसल्याने कर्मचारी यांना कोणी उधार उसनवारी देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत
नगरपंचायत मध्ये कर्मचार्यांना वेतन देण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याने अडचणी वाढल्या आहेत गेल्या आठवड्यात मुरुम टाकण्या बाबत मुख्याधिकारी यांचे समोर सत्ताधारी नगरसेवक व विरोधी नगरसेवक जोरदार मागणी झाली कोणाला किती निधी मुरुम टाकण्यासाठी उपलब्ध करायचा यांवरून खडाजंगी झाल्याचे समजले प्रत्यक्षात नगरपंचायत कडे पुरेसा निधी नसल्याने मुरुम टाकण्याचे तोंडी आश्वासन मिळाले पंधरा दिवस झाले प्रत्यक्षात नगरपंचायत कडून श्रीपूर भागात मुरुम टाकलाच नाही