महाराष्ट्र

शिवरत्न कंट्रक्शन कंपनी प्रोजेक्ट मॅनेजर, जनरल मॅनेजर हे निष्क्रिय अधिकारी प्रशासन आहेत : आंदोलनकर्ते शिवराम गायकवाड

उपसंपादक—- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. ;– 97 30 867 448

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील बोरगाव गावी मुक्कामी येण्यापूर्वी बोरगाव ते माळेवाडी (बोरगाव) या जोड रस्त्याचे मुरमीकरण करा या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले होते या निवेदनात खड्ड्याची दुरुस्ती केली नाही तर आषाढी वारी काळात खड्ड्यात बसून भजन आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्ते शिवराम गायकवाड यांनी दिला आहे या निवेदनाच्या अनुषंगाने कर्तव्यदक्ष सार्वजनिक बांधकाम विभाग,अकलूज यांनी प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण(NHAI) कार्यालय, पंढरपूर यांच्याकडे लेखी पत्र देऊन २५ जून २०२३ पूर्वी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२३, पालखी बोरगाव ता.माळशिरस गावी मुक्कामी येण्यापूर्वी रस्त्याचे दुरुस्ती करण्याचे सक्त आदेश दिले आहेत

आपले कार्यालयामार्फत प्रगतीत असलेले संत तुकाराम महाराज पालखी मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ जी या रस्त्याचे बांधकाम करणेकरीता गौणखनिजांची (खडी / मुरुम / दगड इ. ) वाहतुकीमुळे “जांबुड बोरगांव खंडाळी (भाग- बोरगांव ते माळेवाडी (बोरगांव)) प्रजिमा १७९ रस्त्यावर खडडे पडलेले आहेत.” तरी दि. २५/०६/२०२३ रोजी संत तुकाराम महाराज यांची पालखी बोरगांव येथे मुक्कामी येण्यापुर्वी या रस्त्यावर पडलेले खड्डे भरून रस्ता वाहतुकीकरीता सुस्थितीत ठेवावा. असा लेखी आदेश दिनांक १९ जून २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांनी प्रकल्प संचालक,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण(NHAI) कार्यालयाकडे लेखी पत्राअन्वये कळवले असतानाही शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी अकलूज यांचे संबधित प्रोजेक्ट मॅनेजर,जनरल मॅनेजर, संबधित अधिकारी व कर्मचारी हे वारकऱ्यांच्या मागणीकडे का बरं जाणूनबुजून कानाडोळा करीत आहेत?

शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर, जनरल मॅनेजर व इतर अधिकारी हे सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांचा आदेश पायदळी तुडवत मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत का? वारकरी,नागरिक,विद्यार्थी,शेतकरी कामगार यांना ये -जा करणेसाठी, वाहतुकीसाठी त्रासच द्यायचाच आहे का? ते नागरिकांचा,शेतकरी – कामगारांचा,शाळकरी चिमुकले विद्यार्थ्यांचा,ग्रामस्थांचा अपघात होण्याची वाट पाहत आहेत का? पालखी महामार्गावर शिवरत्न कंट्रक्शन या नावाने फक्त बॅनर बाजीच करायची आहे का ? त्यांना नागरिकांचे काहीच देणंघेणं नाही का? असा सवाल आंदोलनकर्ते शिवराम गायकवाड यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button