राजकीय आणि सामाजिक कामांचा वसा घेउन निरंतर चालणारा अल्पसंख्यांक समाजातील युवक म्हणजे जुबेर भाई खाटीक…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर गाव,हे गाव तस तत्कालीन लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या विचारांचे,उरून इस्लामपूर च्या नगर परिषदे साठी 1957 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत वॉर्ड क्र 4 मध्ये महंमद इस्लामभाई खाटीक हे उमेदवार होते,या निवडणुकीत सर्व कामे हि एका लाकडाच्या वखारितूनच चालतं होती,लोकनेते राजाराम बापू पाटील यांचा खाटीक घराण्यावर कायमचा विश्वास बसला तो येथूनच…
महंमद भाई खाटीक यांच्या नंतर सामाजिक आणि राजकीय वसा नाजीमभाई खाटीक यांच्या कडे आला,नाजीमभाई यांनीहि त्यांच्या कालखंडा मध्ये काँग्रेस चे सरचिटणीस म्हणून उल्लेखनीय जबाबदारी पार पाडली…
आत्ताच्या घडीला खाटीक घराण्याचा राजकीय आणि सामाजिक वारसा अखंडपणे वहात असलेले जुबेरभाई खाटीक यांची नुकतीच अल्पसंख्यांक विकास मंडळ या संघटनेवर शोएब भाई खाटीक यांनी “प्रदेश सचिव” म्हणून निवड केली…
जुबेर भाई खाटीक यांच्या बद्दल बोलायचे झाल्यास राज्याचे माजी मंत्री आणि शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी चळवळ निर्माण केली…
आणि हिच विद्यार्थी चळवळ जुबेर भाई खाटीक यांना त्यांच्या राजकीय जीवनात आलेली मोलाची संधी ठरली,विद्यार्थी काँग्रेस चे अनेक वर्षे काम करत असताना ग्राहक संरक्षण जिल्हा महासचिव म्हणून हि अनेक वर्षे जनतेच्या समस्या मांडण्याचे काम जुबेर भाई खाटीक यांनी केले…
आज राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक अडचणी येतात आणि जातात परंतु न डगमगता जनतेची बाजू मांडणारा “युवक नेता” म्हणून जुबेर भाई खाटीक यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल…
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या कुटुंबाशी प्रामाणिक राहून जो विश्वास जुबेर भाई खाटीक यांनी निर्माण केला आहे त्या विश्वासाला कळसा पर्यंत पोहचवायचे काम प्रतीक (दादा) पाटील यांच्या माध्यमातून होत आहे…
एखाद्या सामान्य घरातील युवकाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी मिळालेल्या संधीच सोन कसे होते हे जुबेर भाई खाटीक यांच्या कडे पाहिल्यावर कळते…
सांगली जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे युवा नेतृत्व जुबेर भाई खाटीक यांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीस माझ्या अनेकानेक शुभेच्छा…