शहर

विक्रमगड तालुक्यातील १० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

विक्रमगड तालुक्यातील औंदे येथील श्री स्वामी समर्थ परिवाराच्या श्री स्वामी समर्थ मठातर्फे विक्रमगड व जव्हार तालुक्यातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या १० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, स्कूल बॅग व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
पालघर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा अभिनव कार्यक्रम रविवारी संपन्न झाला.

श्री स्वामी समर्थ परिवाराच्या लक्ष्मीकांत दांडेकर व अर्चना दांडेकर यांच्या पुढाकाराने संपन्न या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संतोष पावडे, विक्रमगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे, सागर आळशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शिक्षणापासून एकही मुलगा वंचित राहू नये विशेष करून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, त्यांना समाजात ताठ मानेने जगता यावे हा उद्देश ठेवून लक्ष्मीकांत दांडेकर यांनी गेल्या २१ वर्षापासून विक्रमगड तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य विद्यार्थ्यांना नित्यनेमाने देत आहेत. याच बरोबरीने या संस्थेमार्फत नागरिकांसाठी व्यसनमुक्ती, तरुण मुलींसाठी वैद्यकीय शिबीर, सॅनिटरी पॅड चे वितरण व इतर उपक्रम राबविले जात आहेत.

दरवर्षी १० ते १२ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जात असून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम या संस्थेकडून राबविण्यात येतात. या मठाच्या माध्यमातून फक्त अध्यात्मिक विकास साधला गेला नाही तर अध्यात्मावर सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय असा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.

आदिवासी भागात अशा प्रकारचे उपक्रम राबवित असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी स्तुती करत हा उपक्रम मोखाडा तालुक्यात देखील राबवावा अशी इच्छा प्रकट केली. डॉ. सवरा आणि आमदार वनगा यांनी या उपक्रमात आपल्या स्वर्गीय वडिल सहभागी होत असत अशी आठवण सांगत या मठातून राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमाची प्रशंसा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button