अकलूज नगर परिषदेचे मुस्लिम दफन भूमी कडे दुर्लक्ष —समाजात असंतोष

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.——–97 30 867 448
संपूर्ण आशिया खंडात पूर्वी अग्रेसर असलेल्या ग्रामापंचायत अकलूज चे नुकतेच एक वर्षापूर्वी नगर परिषदे मध्ये रुपांतर झाले परंतु अल्पसंख्याक समाजा बाबत नगररिषदेचे अद्याप कानाडोळाच दिसुन येत आहे .मुस्लीम बांधवाच्या पवित्र असलेल्या दफनभूमी मध्ये जनावरांचा सुळसुळाट झाला असुन गेल्या अनेक वर्षापासून दफनभूमी ची भिंत पडलेली असल्याने तेथुन खुलेआम जनावरे वावरत आहेत.

धुमाकूळ घालत आहेत….यासंदर्भात नगरपरीषदे कडे लेखी तोंडी सांगून सुद्धा कोणीतीही दखल घेतली जात नाही या दफनभूमी मध्ये…ज्यांचे आईवडील, नातेवाईक या पावनभूमीत दफन आहेत अशा ठिकाणी हि प्राणी नाचत असुन कबरीवर मलमुञ आणि विष्ठा करत आहेत . त्यामुळे समाजात तीव्र असंतोष व चीड निर्माण होत आहे. त्याचेंवर कायमस्वरुपी आळा घालून बंदोबस्त करावा अशी मागणी समाजातुन होत आहे. तसेच शासन आणि प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे समाजातुन बोलले जात आहे.




