वंदे भारत मुंबई सोलापूर-एक्सप्रेस चे कुर्डुवाडी रेल्वे स्थानकात जल्लोषात स्वागत

करमाळा: प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
मुंबई येथून वंदे भारत ही एक्सप्रेस निघाल्यानंतर जेव्हा कुर्डूवाडी रेल्वे स्थानक येथे पोहोचली तेव्हा अत्यंत उत्साही वातावरणात पुष्पहार घालून आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जि.प.चे माजी सभापती शिवाजी कांबळे, भारत पाटील, प्रांताधिकारी ज्योती कदम व रेल्वे अधिकारी उपस्थित होते. वंदे भारत एक्सप्रेस चे लोको पायलट यांचा सन्मान आ.मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर व कुर्डूवाडी या दोनच ठिकाणी थांबा असलेली अत्यंत महत्त्वपूर्ण अशी वंदे भारत एक्सप्रेस आहे. भारतामध्ये ज्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाले आहेत त्या इतर राज्यांना जोडणारे आहेत, परंतु मुंबई सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेस चा मार्ग हा महाराष्ट्रात सुरू होतो व संपतो ही.
वंदे भारत एक्सप्रेसला अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीने बनविलेले आहे केवळ 50 सेकंदातच ती पूर्ण वेग धारण करते व डब्यांची रचना ही बुलेट ट्रेन प्रमाणे दिसून येत आहे. बैठक व्यवस्था ही संपूर्ण वातानुकूलित यंत्रणेसह ऍडजेस्टेबल बॅकपुश सीट सह उपलब्ध आहे. या गाडीचे दरवाजे देखील स्वयंचलित असून जेवणाची व नाश्त्याची देखील सोय गाडीमध्ये आहे. सोलापूरहून सुटल्यानंतर ही गाडी सध्या सहा तास तीस मिनिटे एवढ्या कमी वेळेमध्ये मुंबईत पोहचते.
यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम या घोषणांनी कुर्डूवाडी रेल्वे स्थानक परिसर दुमदुमून गेला होता. भारत देशातील विविध राज्यातून महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथे अनेक प्रवासी येतात त्यामुळे मुंबई सोलापूर वंदे भारत ही एक्सप्रेस सोलापूर जिल्ह्यातील व परिसरातील व्यापारी उद्योजक अधिकारी व सर्वसामान्य नागरिक त्याबरोबरच पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर या व इतर देव देवस्थानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक्सप्रेस आहे.
या एक्सप्रेसच्या स्वागतासाठी करमाळा तालुक्यातून अजित तळेकर,भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, माजी सरपंच डॉ.अमोल घाडगे, तात्यासाहेब गोडगे, सुदर्शन तळेकर शाम सिंधी, नरेंद्रसिंह ठाकूर, सचिन चव्हाण, काकासाहेब दगडे, ज्ञानेश्वर पवार यांचेसोबत सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते, रेल्वे अधिकारी – कर्मचारी व प्रवासी बहुसंख्येने उपस्थित होते.



