सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागात सहकार महर्षींची 44 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

उपसंपादक -हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची 44 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डाॕ. निखिल मिसाळ उपस्थित होते तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम सर्व शिक्षक वर्ग व पालकवर्ग उपस्थित होते
प्रारंभी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून त्यांना अभिवादन करण्यात आले
यावेळी आनंदयात्री बालवाद्य वृंदातील विद्यार्थी कलाकारांनी महर्षी गीत सादर करून सहकार महर्षींच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले
तसेच प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता चौथीचा विद्यार्थी सतीश भोसले याने सहकार महर्षी बद्दल आपले मनोगत व्यक्त केले तसेच जनसेवा संघटना आयोजित सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुण्यतिथी निमित्त 10 फेब्रुवारी 2023 रोजी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत प्रशालेतील 700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला तसेच वार्षिक स्नेहसंमेलनातील सहभागी छोटा गट व मोठा गट आणि पहिली ते चौथी च्या सहभागी वर्गांचे व क्रमांक प्राप्त केलेल्या वर्गाचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांचे असते करण्यात आले
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत सहकार महर्षींचे शिक्षण व सहकार प्रसाराचे कार्य सर्वोच्च आहे उत्तम कारभार सजग मन सामाजिक जाणीव निस्वार्थ वृत्ती माणसे जोडण्याची कला समाजाभिमुख धोरणे या सर्वांचे मूर्तीमंत प्रतिक असणारे, सहकार महर्षी कैलासवासी शंकराव मोहिते पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
याप्रसंगी निखिल मिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव मॅडम आणि प्रदीप मिसाळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार नुरजहाँ शेख मॅडम यांनी मानले





