शहर

राज्यातील ७० लाख रामोशी समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणून शासनाचा लाभ मिळवून देणार – संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, 8378076123

  • राज्यातील ७० लाख रामोशी समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना शासनाच्या योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी समाजस्तरावर जनगणना सर्व्हे केला जात असल्याचे प्रतिपादन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत (नाना) शितोळे यांनी केले.

पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने आयोजित जनगणनेची सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी सुधीर नाईक, अंकुश जाधव, ॲड मनोज जाधव, सतीश माने, राहुल मदने, रविंद्र जाधव, सुनिल बोडके, आबासो बोडके, निलेश बोडके, वर्धमान बोडके, नवनाथ वाळेकर, बाळासाहेब पडळकर, बंडू पडळकर, बिभिषण सुर्यवंशी, आप्पा भंडलकर, विठ्ठल मंडले, दादासो खोमणे, दत्ता बोडके, किरण खोमणे, अमोल मसुगुडे, दत्तात्रय चव्हाण, रोहित चव्हाण, अक्षय पवळ, एकनाथ चव्हाण आदि उपस्थित होते.

दौलत शितोळे पुढे म्हणाले, राज्यातील रामोशी, बेरड व बेडर समाजबांधवांची संख्या ७० लाख असून तीस वर्षांपूर्वी त्यांची जनगणना करण्यात आली होती. त्यामुळे शासनाच्या योजनांचा फायदा समाजाला कसल्याही प्रकारचा झाला नाही. परंतु संघटनेच्या वतीने राज्यातील समाजबांधवाचा जनगणनेचा सर्वे करण्यात येत असून त्याची निश्चित आकडेवारी शासनाला कळवून त्यातून समाजाचा विकास करून समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मागील ७० वर्षात शासकीय लाभापासून दूर ठेवण्यात आला. समाजातील तरुणांना वेगवेगळ्या खून, दरोडे, मारामाऱ्या यामध्ये अडकवून ठेवण्यात आले. आमच्यावर दरोडेखोराचा शिक्का मारण्यात आला, तो पुसण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

समाजाचे सत्तर वर्षात शासनाला करता आले नाही. आम्ही शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून पूर्ण करून घेत आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची केलेली घोषणा ही आमच्या समाजासाठी भूषणावह गोष्ट आहे. महिला व तरुणांना या माध्यमातून आर्थिक मदत करून उभा करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात छत्रपतींनी समाज बांधवांना १४ हजार हेक्टर जमीन कसण्यासाठी दिली होती, ती पुन्हा परत मिळवण्यासाठी प्राधान्याने काम करणार आहे. काही विघ्न संतोषी समाजबांधव समाजाला संपवण्याचा विडा उचलणारे नेते कमी गुंड जास्त असणारी लोक त्रास देत आहेत. पण याद राखा कार्यकर्त्याला त्रास द्याल, तर मी सोडणार नाही असे शेवटी दौलत शितोळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता जाधव यांनी केले. स्वागत कल्याण भंडलकर यांनी केले. तर रोहित मदने, अंकुश जाधव यांची यावेळी भाषणे झाली. आभार आप्पा भंडलकर यांनी मांडले. कार्यक्रमास तालुक्यातील व परिसरातील समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button