सदाशिवनगर येथील विजयसिंह मोहिते पाटील व्यापारी संकुल गाळ्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो. 97 30 867 448
शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर यांच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील व्यापारी संकुल या गाळ्याचे भूमिपूजन शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन तथा विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील.( काकासाहेब ) कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील (अक्कासाहेब ) कै. प्रतापसिंह मोहिते पाटील (पप्पासाहेब) यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे व्हा. चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संचालक दत्तू काका रणवरे, संजय कोरडकर, शिवाजी गोरे, धोंडीराम नाळे, सुरेश वाघमोडे, नंदन दाते, सुनील माने, अर्जुन धाईंजे, सुरेश मोहिते, अलका पाटील, पंचायत समितीचे माजी उपासभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, RPI चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, बिनु पाटील, नारायण सालगुडे पाटील, लालखान पठाण, विलास फडतरे, अभिमान सावंत, तुकाराम चव्हाण, ज्ञानदेव पालवे, पुरंदावडे सौ. राणी मोहिते, सदाशिवनगरचे सरपंच विरकुमार दोशी, जाधववाडीचे सरपंच शिवाजी जाधव, देविदास ढोपे, शिवराज निंबाळकर, अंकुश डुबल, उपसरपंच उदय धाईंजे, दादा पालवे, वसंत ढगे, तानाजी ओवाळ, हणमंत धाईंजे, तानाजी पालवे, हुसैन मुलाणी,संतोष शिंदे,सुभाष सुज्ञे, कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, सर्व खाते प्रमुख, इतर पदाधिकारी, कर्मचारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




