महाराष्ट्र

लहान बाळांच्या वेदनेला फुंकर मारणारे व सेवाभाव जपणारे गोरगरिबांचे डॉक्टर म्हणजे डॉक्टर फैयाज शिकलगार–ईकबाल मुल्ला (पञकार)

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

सांगली मध्ये सेवाभाव जपणारे , लहान बाळांच्या वेदनेला फुंकर मारणारे लहान मुलांचे डॉक्टर असा नावलौकिक प्राप्त झालेले माझे मित्र डॉ .फैय्याज बशीर शिकलगार यांचा आज वाढदिवस !
गोरगरिबांचे डॉक्टर अशी “बिरुदावली” ज्यांना महाराष्ट्राने अर्पण केली त्या सांगलीतील स्वर्गीय डॉक्टर निसरगंड यांच्यानंतर आज सांगली जिल्ह्यात आपल्या “अचूक निदानाने” लहान बालकांना अल्पावधीत निरोगी करून त्यांच्या चेहऱ्यावर “आनंद -समाधान” देणारे ,देवमाणूस म्हणून “ख्याती” प्राप्त असणारे डॉ. फैयाज शिकलगार हे आज लोकाभिमुख होत आहेत .

सर्वसामान्य जनता महागाईने “भरडली” जात असताना ,गोरगरिबांना आपल्या हॉस्पिटल मध्ये कमी खर्चात औषधोपचार करून रुग्णांच्या पालकांना आर्थिक दिलासा देण्याचे महान कार्य आज ते करत आहेत . सांगलीत वार्षिक 3 तें 4 आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून कमी खर्चात महिलांची डिलिव्हरी, महिलांचे ऑपरेशन तसेच महिलांच्या अनेक आजारांवर त्यांच्या पत्नी डॉक्टर तब्बसूम शिकलगार यांच्या सहकार्याने “वाजवी दरात ते जनतेची सेवा करतात.

माझे एक परिचित व्यक्ती सांगलीतील जुने स्टेशन रोड रोड जवळील डॉ फैयाज शिकलगार यांच्या मॉम हॉस्पिटल* मध्ये ( बिल) Bil भरण्यास “असमर्थ ” होते . त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते . मी डॉक्टरांना त्यांची परिस्थिती कथन केली आणि त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता .डॉ .फैयाज शिकलगार यांनी त्यांचे बिल क्षणार्धार्थ माफ केले आणि. डॉक्टर हे देवदूत असतात हे आज डॉ फैय्याज यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे .माझ्या व्यस्त दिनक्रमामुळे 2 दिवसापूर्वी झालेल्या डॉक्टरांच्या वाढदिवसानिमित्त मी “शुभेच्छा ” देण्यासाठी उपलब्ध नव्हतो .म्हणून आज शब्दरूपाने त्यांना शुभेच्छा देत आहे .

डॉ .फैय्याज यांना पत्नी डॉ .तब्बसूम यांचे निरागस , उत्कट व प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉ .फैय्याज यांचे बलस्थान आहे .जनतेच्या सेवाभावात त्यांचे विशेष सहकार्य डॉक्टरांना लाभत आहे.
जनतेच्या मनातील देवमाणूस म्हूणन कीर्ती प्राप्त करणाऱ्या माझ्या मित्रास .. डॉ .फैय्याज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
इकबाल मुल्ला ( पत्रकार )
संपादक – सांगली वेध ,
संपादक – वेध मीडिया न्यूज ,सांगली .
मोबाईल – 8983587160
आणि
टाइम्स 9 मराठी न्युज चॕनेल च्या वतीने “वाढदिवसाच्या लक्ष,लक्ष,शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button