महाराष्ट्र

धनगर समाज आरक्षण आणि भटक्या विमुक्त जातीच्या प्रश्नावर माजी आ.नारायण पाटील यांनी काय केले.शिवसेना ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांचा सवाल

करमाळा प्रतिनिधी अलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा तालुक्यातील जेऊर या ठिकाणी 3 कोटी 42 लाख रुपयाचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असून हा निधी मिळवण्यासाठी शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी सतत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. परंतु हा निधी आम्हीच आणला म्हणून खोटारडे- पणा करित रणजीत सिंह मोहिते पाटील आणि माजी आ. नारायण पाटील यांनी नुकतेच या कामाचं भूमिपूजन केले. पण त्याच्या या लबाडीचा भंडाफोड करीत. शिवसेनेच्या वतीने या कामाचे भूमिपूजन सोहळा अधिकृतपणे आम्ही करत आहोत असा दावा बाळासाहेब किसवे यांनी केला
बाळासाहेब किसवे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी किसवे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, या राज्यात प्रचंड मोठया पद्धतीने विकास कामे मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून केले जात आहे. या विकास कामाचाच एक भाग म्हणून चिवटे यांच्या प्रयत्नातुन करमाळा आणि जेऊर येथे हा निधी आला आहे. तर या निधीचा श्रेय लाटण्यासाठी या मंडळी हा खोटारडे पणा चा कळस गाठला आहे. आणि जेऊर व करमाळा परिसरात नारायण पाटील यांनी धनगर समाजाच्या जीवावर आमदारकी मिळवली परंतु नारायण पाटलांनी धनगर समाजच्या आरक्षण प्रश्नात काय योगदान दिले. हे स्पस्ट करावे असा सवाल ही किसवे यांनी उपस्थित करीत. मी धनगर समाजाचा सच्चा सैनिक असून मी समाजासाठी आज ही पक्ष भूमिका बाजूला ठेऊन समाज प्राधान्य ही भूमिका घेतलेली आहे. मात्र याउलट पाटील यांनी धनगर समाज व ओबीसीच्या आरक्षणासाठी भूमिका कधीही घेतली नसल्याचे दिसते आहे. म्हणून येणाऱ्या काळात या परिसरातील बांधवानी मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना पक्ष या सोबत राहावे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदिनाथ कारखान्याचे माजी वाईस चेअरमन चंद्रकांत सरडे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विलास दादा पाटील यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा प्रमुख महेश चिवटे, महिला जिल्हा प्रमुख आरती ताई बसवनती, जोतीताई शिंदे, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, तालुका प्रमुख, बाळासाहेब करचे राहुल कानगुडे नवनाथ गुंड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थिती होते.

जेऊर गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यास पोलिसांनी विरोध केल्यानंतर बाळासाहेब किसवे संतप्त झाले यावेळी बोलताना म्हणाले की देशात लोकशाहीचे राज्य असून गुंडगिरी मोडण्यासाठीच आम्ही आलो आहोत जनतेने दडपणाखाली न राहता लोकशाहीच्या मार्गाने मार्गक्रमण करावे या दडपशाहीमुळे जिओचे अधोगती झाल्याचा आरोप किसवे यांनी केला जाणीवपूर्वक शिवसैनिकांना त्रास देऊ नये असा इशारा दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button