शहर

शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठान माकणे यांच्या वतीने माकणे ग्रामपंचायत हद्दीत बसवलेल्या 16 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या हस्ते

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील माकणे गावातील शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठानने 78 व्या स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून गावात 16 सिसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी सफाळे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या शुभहस्ते पार पडला .

माकणे गावातील सुशिक्षित सुजाण तरुणांनी एकत्रित येऊन शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून स्वखर्चातून हा ग्रुप माकणे गावात विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहेत. गावात कोणता अनुचित प्रकार घडू नये आणि चुकून जर काही घडल्यास त्यावर नजर ठेवण्यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आनंद तरे यांच्या वाढदिवसानिमित्त काही दिवसांपूर्वी गावाच्या हद्दीत हे 16 सिसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. या कॅमेऱ्यांची कार्यप्रणाली सुरू करून माकणे ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करण्यासाठी गुरुवार 15 ऑगस्ट रोजी दत्त मंदिरात पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या हस्ते उद्घाटनाचा हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी महावितरण विभागाची अधिकारी बैतूले, शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button