महाराष्ट्र

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यावर हेलीकॉप्टरमधुन प्रथमच होणार पुष्पवृष्टी

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी मोबाईल 8378076123

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवार दि. 24 जून 2023 रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे आगमन होणार आहे. तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय येथील भव्य प्रांगणामध्ये होत असते.

पुणे येथील उद्योगपती एल. बी. कुंजीर हे अकलुज येथील सदाशिवराव माने विद्यालयामध्ये पालखीचे आगमन झाल्यानंतर हेलीकॉप्टरमधुन संत तुकाराम महाराज यांच्या पालखीवरती पुष्पवृष्टी करणार आहेत. त्यावेळी हेलीकॉप्टरमध्ये देहु संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख अजीत मोरे, देहु संस्थान माजी अध्यक्ष बापुसाहेब मधुसुदन देहुकर महाराज, मा. विश्वस्त सुर्यकांत मोरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथे संपन्न होत असते. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व मोहिते पाटील परीवाराच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळ्याचे योग्य नियोजन असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button