पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्षपदी सोमनाथ भोसले तर सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अमित कांबळे

टाइम्स 9 मराठी न्यूज
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्षपदी अकलूज येथील सोमनाथ भोसले यांची तर सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अमित कांबळे यांची निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार लॉंगमार्च प्रणेते जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन करण्यात आली
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात सोमवार 6 फेब्रुवारी रोजी या निवडीचे आयोजन करण्यात आले होते निवड करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सर बोलताना म्हणाले सोमनाथ भोसले यांनी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडून सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद वाढवली आहे त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून सर्वसामान्यांना न्याय दिलेला आहे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करीत असताना मला आनंद होत आहे त्यांच्या खांद्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युवकांचे जाळे त्यांनी निर्माण करून पक्ष आणखी मजबूत करावा पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तसेच सोलापूर शहराध्यक्ष अमित कांबळे यांनीही सोलापूर शहरामध्ये पक्षाचे चांगले काम केल्याने सोमनाथ भोसले यांच्या रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या जागेवर त्यांना बढती देऊन त्यांचीही सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली निवडीनंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांनी दोघांनाही पेढे भरवून सत्कार करून शुभेच्छा दिल्या.निवडीला उत्तर देताना सोमनाथ भोसले म्हणाले की पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करीत असताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी वेगवेगळी आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून दिला सामाजिक कार्य करीत असताना लोकांचे प्रश्न सोडवत असताना कधीही कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही फक्त काम करीत राहिलो आणि या केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणूनच आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी मला देण्यात आली. राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे व सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहिल्यामुळेच आज माझी निवड झाली आहे.राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युवक आघाडीची ताकद वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले व या आनंदाच्या क्षणी राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे हे तब्येत ठीक नसल्याने येऊ शकले नाहीत परंतु फोनवरून त्यांनी मला शुभेच्छा देऊन कायम पाठीशी असल्याचे सांगितले त्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले,उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र संघटक प्रमोद टाले,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रक्ष प्रवक्ता राजेशभाई जाधव,मुंबई प्रदेश अध्यक्ष विजय वाघमारे,महाराष्ट्र युवक संघटक कपिल लिंगायत, माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे सर यांचे स्वीय सहाय्यक आनंद कडाळे यांनीही दोघांना शुभेच्छा दिल्या.सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयासमोर हालगीनाद करून फटाके फोडून आनंद व्यक्त केला.निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी दादर चैत्यभूमी येथे जावून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजीत सरवदे,सोलापूर शहर संपर्कप्रमुख शरणू हजारे, शहर कार्याध्यक्ष अनिल सोनकांबळे यांचेसह माळशिरस तालुकाध्यक्ष सचिन कांबळे,तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे,युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, कार्याध्यक्ष अमित जवंजाळ,तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे,संघटक पांडुरंग चव्हाण,पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन जाधव,तालुका सरचिटणीस गणेश गायकवाड,युवक तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड,अकलूज शहर संपर्कप्रमुख शिवाजी खडतरे,शहर युवक कार्याध्यक्ष शहाजी खडतरे,शहर सचिव साजिद बागवान, बाबासाहेब ननवरे,वैभव आंबुरे,अनिकेत शिंदे,आदर्श गायकवाड,जावेद शेख,आदेश थोरात,राजू बागवान, प्रशांत भोंडवे,अमोल शिवपालक,रोहन गायकवाड,माऊली गायकवाड यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.





