मार्डी ता.लोहारा जि.उस्मानाबाद येथे संपन्न होणाऱ्या ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती ऊसानिमित्त भाविकांच्या सुविधा पुरविण्या बाबत प्रशासनास निवेदन

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
मार्डी ता.लोहारा .जि.उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा जैनुद्दीन चिस्ती समरकंदी (र.अ.) जिंदावली यांचा 697 उरूस सालाबाद प्रमाणे याही वर्षी अनुक्रमे 25, 26 ,27 ,फेब्रुवारी 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश ,च्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने लोहारा येथील तहसीलदार यांना सुविधा पुरवण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की मार्डी ता. लोहारा जि. उस्मानाबाद येथील दर्गा हजरत ख्वाजा जैनुद्दीन चिस्ती समरकंदी (र.अ.) यांच्या उरूस निमित्त संदल दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार असून या संदल चा मान लोहारा तहसील कार्यालयाला असून संदल दिवशी तहसील कार्यालयातून तहसीलदार यांच्या डोक्यावर संदल चे कलश ठेवून सर्व मानकरी व मान्यवर यांच्यासह मिलाद पठण करत, वाद्य वाजवत ,संदल लोहारा येथून निघून मार्डी येथे दर्ग्यात आल्यानंतर सर्व मानकरी, मान्यवर ,ग्रामस्थ, मुजावर, यांच्या उपस्थितीत संदल व चादर ,फुल, समाधीवर वाहून त्यानंतर फातिहा पटन करून प्रसाद वाटप केला जाणार आहे दुसऱ्या दिवशी दि. 26 फेब्रुवारी2023 रोजी दिवसभर मार्डी आणि परिसरातील सर्व समाजातील भाविक भक्त ख्वाजा साहेबांच्या दर्शनाला येत असतात तसेच सायंकाळी 9 वाजता कव्वालीचा कार्यक्रम होणार असून रात्री 11 वाजता मानकरी यांच्या उपस्थितीत दर्गाहवर दिवे लावले जातात त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे तिसऱ्या दिवशी दि.27 फेब्रुवारी2023 रोजी सकाळी 10 वाजता जियारत चा कार्यक्रम संपन्न होणार असून त्यामध्ये कुराणपठण व फातेहाख्वानी झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे ,विशेषतः तिसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी भाविकांची संख्या अधिक प्रमाणात दर्शनासाठी हजेरी लावत असतात या उरुसानिमित्त खेळणी, मिठाई, बांगड्या ,अशा विविध प्रकारचे स्टॉल थाटले जातात त्याकरिता मार्डी येथे संपन्न होणाऱ्या उरुसानिमित्त व येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाने आपल्या स्तरावरून संबंधित खात्यांना सूचित करून व भाविकांसाठी पिण्याचे पाणी, थ्री व्हेज लाईट, शौचालय, प्रथमोपचार केंद्र ,पोलीस बंदोबस्त ,इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी ऊर्स कमिटीच्या वतीने करण्यात आली असून माहितीस्तव ;-या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी उस्मानाबाद ,जिल्हा वक्फ बोर्ड उस्मानाबाद, लोहारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उप अभियंता म.रा.वि.परिमंडळ लोहारा, गटविकास अधिकारी पंचायत समिती लोहारा, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय लोहारा ,तसेच सरपंच/ ग्रामसेवक ग्रामपंचायत मार्डी यांना देण्यात आले आहे तरी उरुसाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ऊर्स कमिटीच्या वतीने सादिक अब्दुल हमीद शेख यांनी केले आहे.




