महाराष्ट्र

श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने उद्या 21 मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने उद्या अकरा फेब्रुवारी रोजी २१ सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केली असल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली

याबाबत अधिक माहिती देताना चिवटे म्हणाले की दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय समोरील प्रांगणात 21 सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली सदर सामुदायिक विवाह सोहळ्याची जोरदारपणे तयारी झाली असून यामध्ये एक बौद्ध पद्धतीने व बाकीचे सर्व हिंदू पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळा लावण्यात येणार आहे यामध्ये दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे सदरचा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत असल्याचे श्री चिवटे यांनी बोलताना सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button