श्री.शंकर सहकारीच्या ३लाख १,१११ व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न.

उपसंपादक हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर च्या गळीत हंगाम २०२२-२३ च्या उत्पाद्दीत झालेल्या ३ लाख ११,११व्या साखर पोत्याचे पूजन श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी व्हा. चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, कारखान्याचे संचालक दत्तात्रय रणवरे, चंद्रकांत शिंदे, सुरेश पाटील, रामदास कर्णे, संजय कोरटकर, शिवाजी गोरे, धोंडीराम नाळे, सुनील माने, सुधाकर पोळ, दत्तात्रय चव्हाण, नंदन दाते, तसेच अनंतलाल दोशी, शिवामृत चे संचालक अरविंद भोसले, अभिमान सावंत, विनायक पराडे, बापू पवार, हनुमंत कोडलकर, सरपंच विरकुमार दोशी, उपसरपंच उदय धाईंजे, ग्रा. सदस्य हुसेन मुलाणी, अभिमान सावंत, किशोर देवकुळे, विष्णू भोंगळे, नवनाथ ओवाळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, जनरल मॅनेजर रविराज जगताप, वर्क्स मॅनेजर प्रफुल्ल चव्हाण, चीफ केमिस्ट दत्तात्रय देशमुख, शेतकी अधिकारी आनंदराव गायकवाड, चीफ अकाउंटन्ट शेंडगे साहेब, लेबर ऑफिसर कैलास कदम, संगणक विभाग प्रमुख देवकर साहेब, डिस्टीलरी विभाग प्रमुख संजय मोरे, सेक्युरिटी ऑफिसर ज्ञानदेव पवार, सिव्हिल इंजिनियर राहुल मगर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





