बाबासाहेब सोनवणे यांचे अल्पशा आजाराने निधन..

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज येथील फळ व डाळिंब विक्रेते व्यापारी बाबासाहेब विठ्ठल सोनवणे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवार दिनांक 9 जुलै 23 रोजी अकलुज येथे निधन झाले बरेच वर्षे या व्यवसायात राहून त्यांनी आपले नाव कमावले ते धार्मिक वृत्तीचे होते तसेच विविध सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा असे गोरगरीब जनतेला ,व्यापाऱ्यांना ते सढळं हाताने मदत करत परोपकार हा त्यांचा आवडता छंद होता.

ते “आण्णा” या नावाने परिचित होते अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब व्यापारी संघटनेचे ते बरेच वर्षे अध्यक्ष होते त्यांच्या मनमिळावू व परखड स्वभावाने ते सर्व परिचित होते त्यांचे आकस्मित निधनाने मंडई ,व्यापारी व शेतकरी वर्गात तसेच आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांचे पश्चात ३ भाऊ,पत्नी ,२ मुले अक्षय, व अतुल तसेच एक मुलगी जावई व नातवंडे असा परिवार आहे अकलूज ग्रामपंचायत माजी सदस्य नाशिकराव सोनवणे हे त्यांचे बंधू होत त्यांचे आकस्मित निधनाबद्दल अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, उपसभापती . मामासाहेब पांढरे व सचिव राजेंद्र काकडे यांनी दुःख व्यक्त केले त्यांचा अंत्यविधी आज अकलूज येथील अकलाई वैकुंठ स्मशान भूमीत झाला त्यावेळी समाजातील सर्व स्तरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते



