शैक्षणिक

बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या मुलींचा शिवसेनेकडून सत्कार

करमाळा प्रतिनिधी आलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

बारावी परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने आज सत्कार करण्यात आला.

करमाळा येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील नमिरा इन्नूस फकीर (करमाळा) हिने बारावी सायन्स परीक्षेत ९२ .७७ % गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे तर कू साक्षी गणेश देशमाने ( मांगी) ८९.६७ % कू तन्वी रवींद्र अडसूळ (भोसे) ८८.५० % गुण मिळवून विद्यालयात यश संपादन केले आहे.

मुलींनी मिळवलेल्या यशाबद्दल करमाळा येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादादा फरतडे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन यशस्वी विद्यार्थिनींचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळेस फरतडे यांनी विद्यार्थ्यांनीना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कालिदास कदम, संतोष वायकर,संजय भोसले, दिशा काँप्युटर चे अतुल चव्हाण सर इन्नूस फकीर, गणेश देशमाने रविंद्र अडसूळ आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button