बुधभूषण फाउंडेशन च्या वतीने पोलीस कर्मचारी प्रदीप जगताप यांचा वाढदिवसानिमित्त झाला सत्कार

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
करमाळा येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले करमाळा चे कर्तव्यदक्ष पोलिस नाईक प्रदीप जगताप साहेब यांचा वाढदिवस बुधभूषण फाउंडेशन च्या वतीने वतीने साजरा करण्यात आला यावेळी करमाळा तहसीलचे नायब तहसीलदार माजीद काझी यांच्या हस्ते जगताप यांचा शाल फेटा श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी मकाई साखर कारखाना चे संचालक तसेच बागल गटाचे धडाडीचे युवा नेते अमोल यादव, माजी नगरसेवक सचिन घोलप,दुर्गेश राठोड,पत्रकार आलिम शेख, राहुल बागल,राजेश पाटील,गणेश राठोड,आनंद शाह,राजू तांबोळी, बलराम परदेशी आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस नाईक जगताप यांनी सत्काराला उत्तर दिले ते बोलताना म्हणाले की सदरचा सत्कार हा आगळावेगळा असून सदरचा सत्कार हा मी कधीही विसरणार नाही पोलीस आणि जनता यांच्यामध्ये नेहमीच समन्वय असतो सदरचा समन्वय राखून आजचा हा माझा सत्कार केलेला आहे असे श्री जगताप बोलताना म्हणाले



