जातेगाव टेंभुर्णी येथील एन्ट्री पॉईंट मध्ये बदल करून जेऊर येथे सुरू सा.9 ते पहाटे 4 वा.पर्यत चालू असलेली एन्ट्री बंद करावी.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
टेंभुर्णी करमाळा जातेगाव हायवेवर चालू असलेली एन्ट्री भिमदल संघटनेनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन चालू असलेली एन्ट्री बंद केली लगेच दोन दिवसानंतर लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून जेऊर येथील चार तर करमाळातून पाच अशी झिरो पोलीसात वाढ करून जेऊर एम एस सी बोर्डाच्या पासून हाकेच्या अंतरावर रोज संध्याकाळी नऊ ते पहाटेचे पाच वाजेपर्यंत एक कॉन्स्टेबल देशपांडे आणि करमाळा शहरातील पाच झिरो पोलीस आणि जेऊर येथील चार एकूण नऊ झिरो पोलिसाच्या साह्याने एन्ट्री गोळा केली जात आहे अशी माहिती रोज रस्त्यावर चालणारे वाहन चालकानी दिली,

काही चालकांनी व प्रवाशांनी पत्रकार व सामाजिक कार्यकर्तेशी बोलताना सांगितले आम्ही रोज या लोकांचा त्रास सहन करावा लागतो वाहन चालवताना तारेवरची कसरत करून जावं लागतं आणि रोज 500 रूपये रोडवर पोलिसांना द्यावे लागते, असशी तळमळीची भावना व्यक्त केली,सदर हा चाललेला जेऊर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रकार तातडीने पोलीस निरीक्षक घुगे साहेब यांनी बंद करून वाहन चालकांना या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सुनिल भोसले यांनी जातेगाव ते टेंभुर्णी हायवेवरील एन्ट्री बंद करावी असे निवेदन दिले होते परंतु करमाळा पोलीसांनी जेऊर टेंभुर्णी येथे नवीन पॉईंट चालू केला आहे तोही ब़द करावी अन्यथा सनदशीर मार्गाने सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयावर उपोषणाला बसण्याची वेळ आणू नये….



