महाराष्ट्र

लोकसभेच्या निकालाची उत्सुकता शिगेला…माढा लोकसभेचा खासदार ठरवणार बुलेट कोण जिंकणार…?

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499

त्याचे झाले असे की,माढा लोकसभा निवडणुकीत कोण निवडून येणार याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली असतानाच महाळुंग श्रीपूर मध्ये वेगळीच चर्चा रंगात येत असून माढा लोकसभा मतदार संघात झालेल्या निवडणुकीत कोण विजयी होणार यावरून अनेक पैजा लागत आहेत…

महाळुंग श्रीपूर नगरपंचायत चे विद्यमान नगरसेवक व आमचे मित्र तानाजी भगत व विद्यमान नगरसेविके चे पती विक्रम लाटे या दोघां मध्ये “बुलेट” गाडी ची पैज लागली आहे,नगरसेवक तानाजी भगत हे मोहिते पाटील समर्थक असुन त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील हेच माढा लोकसभा मतदारसंघात निवडून येणार आहेत अशी पैज लावली आहे तर विक्रम लाटे हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक आहेत म्हणून निंबाळकर हेच मोठ्या मताधिक्याने निवडून येणार म्हणून बुलेट गाडी ची पैज लावली आहे,या मध्ये ज्याचा अंदाज खरा ठरेल त्याला बुलेट गाडी देण्यात येणार आहे,येत्या 4 जुन ला 19 व्या लोकसभा निवडणूकीचा निकाल लागणार आहे या निकालाकडे माढा लोकसभा मतदारसंघा सह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले आहे…

माढा लोकसभेचा खासदार कोण होणार आणि बुलेट गाडी कोण जिंकणार या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे हे मात्र तितकेच खरे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button