“संवेदनशील” शिवतेजसिंह मोहिते पाटील पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाइल नंबर 9890299499
सध्या राज्यामध्ये अवकाळी पावसाने हाहाकार माजविला असुन आपल्या सोलापूर जिल्ह्यामधील माढा तालुक्याला याचा जबरदस्त फटका बसल्याने सोलापूर जिल्ह्याचे युवा नेतृत्व शिवतेजसिंह मोहिते पाटील यानी हया घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित गावांचा दौरा करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत सांत्वन केले आणि तात्काळ पंचनामे करून शासकीय मदत देण्याची मागणी केली…

मतदानाची प्रक्रिया पार पडल्या नंतर अनेक नेते पुढारी मंडळी आप आपल्या भागात फिरकत सुध्दा नाहीत हा आज पर्यंतचा इतिहास राहिला असुन या गोष्टीला अपवाद ठरवत “संवेदनशील” शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी काल दिवसभर अवकाळी ग्रस्त माढा तालुक्याचा दौरा केला…

या दौऱ्या मध्ये शिवतेजसिंह यांच्या बरोबर माढा तालुक्यातील अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते…
