महाराष्ट्र

पालघर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या पथकाने अवैद्य मद्य आणि अन्य साहित्य असा 30 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे तीन दिवस राहिले असताना पालघर जिल्ह्यात दमणच्या अवैध मद्याचा सुळसुळाट झाला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैध मद्य आणि अन्य साहित्य मिळून सुमारे 30 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मद्याचे बॉक्स उतरवणारे व त्यांना मदत करणारे घटनास्थळावरून फरार झाले आहेत
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला पालघर परिसरात अवैध मद्य येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.

याबाबत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कपिल नेमाडे, संदीप सरदार, संजय धांगडा, बजरंग अमनवाड यांच्या पथकाने सापळा रसून तलासरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही कारवाई यशस्वी कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button