महाराष्ट्र

निलेश लंके यांची तुतारी दिल्ली मध्ये गरजेल…?

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाइल नंबर 9890299499

आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत असुन महाराष्ट्रातील 11 जागेवरील उमेदवारांचे भवितव्य सिल होत असताना त्या 11 पैकी एक जागा हि अहमदनगर (अहिल्या नगर) ची आहे आणि इथे महा विकास आघाडीचे निलेश लंके आणि महायुतीचे डॉ सुजय विखे पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे…

ज्या दिवशी निलेश लंके यांच्या नावाची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीच सुजय विखे यांचा पराभव झाला होता असे मतदार संघातील जनतेचे म्हणणे आहे…तरी सुध्दा निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष पुर्वक काम करणे गरजेचे आहे कारण भाजपा हि बिथरली असुन जिथे जिथे भाजपा ला समोरील उमेदवार जड जाईल असे वाटत आहे तिथे तिथे जातीवाद आणि आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून जनतेला संभ्रमात टाकण्याचे काम ते करत आहेत…

तिकडे पंकजा मुंडे यांच्या प्रचारा दरम्यान देवेंद्र फडणवीस हे एकदा सुध्दा फिरकले नसल्यामुळे बीड येथील भाजपा चे कार्यकर्ते संभ्रमात आहेत…
भाजपा वाले आता खरेच बिथरले असुन मोदी लाट वगैरे काही नाही आहे,आमच्या माढा लोकसभा मतदार संघात फक्त “तुतारी” वाजली आहे…

भाजपा ने हिंदु मुस्लीम कार्ड खेळण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न केल्याने मुस्लिम बांधवांनी त्यांची नाराजी मतपेटीतून दाखवली आहे हे येत्या 4 जून ला दिसेल…ऐन निवडणुकीत च हिंदु खतरे मध्ये का असतो असे जनताच विचारू लागली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button