महाराष्ट्र

निवडणुकीतच नेमकं असं का घडतंय…?

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाइल नंबर 9890299499

“हिंदुत्व” हा मुद्दा जसा बीजेपी वाल्यांकडे गेला आहे अगदी तसेच “परप्रांतीय” हा मुद्दा राज साहेबांकडे आहे आणि तो त्यांनी फार दिवसांनी चव्हाट्यावर आणला हे मात्र तितकेच खरे…

गेल्या 7 मे ला तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाले त्या मध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघात तर प्रणिती शिंदे ह्या वरचड होत आहेत हे ध्यानात आले नंतर भाजपा च्या तेथील उमेदवाराने फक्त हिंदु मुस्लीम हेच कार्ड खेळण्याचा शेवट पर्यंत प्रयत्न केला याचा परिणाम असा झाला की,त्या मतदार संघातील जवळ जवळ 77 टक्के मुस्लिम मतदार हा मतदानासाठी बाहेर पडला…

निवडणूका ह्या विकास कामावर होणे अपेक्षित असतानाच अशा प्रकारे होत राहिल्या तर याचे परिणाम आमच्या येणाऱ्या पिढी वर होईल यात मात्र शंका नाही…
400 पार असे जरी भाजपा म्हणत असेल तर ठीक आहे पण 400 च का…? हा प्रश्न सुध्दा अजुन पर्यंत अनुत्तरित आहे,महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडत असताना आत्ता पर्यंत जिथे जिथे मतदान झाले त्या पैकी मुस्लिम बहुल मतदार संघातच हिंदु मुस्लीम कार्ड खेळले गेले हे समजु शकतो परंतु उदाहरण द्यायचे झाल्यास आमच्या माढा लोकसभा मतदार संघात भाजपा ने जो उमेदवार लादला आणि त्यामुळे मतदार संघात एकच कल्लोळ माजला गेला अन् तेथील निवडणुक हि जनतेने अक्षरशः आपल्या हातात घेत शेवट पर्यंत “तुतारी” च वाजली…

दुसरे सांगायचे झाल्यास निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर झाली आणि अहिल्या नगर ची भाजपा बॅक फुट वर गेली मग तिथे का नाही भाजपा ने हिंदु मुस्लीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला असा प्रश्न हि पडणे स्वाभाविक आहे…

मुस्लिम बहुल भागात भाजपा चाच उमेदवार असला म्हणजे हिंदु मुस्लीम कार्ड असे का…?

अजुन एक गोष्ट अशी की,तिकडे बीड लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या शेवटच्या क्षणा पर्यंत देवेंद्र फडणवीस हे साधे फिरकले सुध्दा नाहीत हे हि तितकेच महत्त्वाचे असु शकत नाही का…?

सातारा,कोल्हापूर,सांगली,माढा,बारामती लोकसभा मतदार संघात देखील निवडणूका झाल्याच की मग काही ठिकाणी असे का…? अशी अनेक उदाहरणे देता येतील…
बारामती लोकसभा मतदार संघात तर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे असा सामना झाला मग तिथे हिंदु खतरे में नव्हता का…? हा देखील प्रश्न पडतो…

असे अनेक प्रश्न आहेत की ते फक्त पडतात आणि उत्तरे निवडणुका गेल्या की कायम चे निघुन जातात…
असो तुर्तास इतकेच… आणखी नंतर बोलूच

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button