महाराष्ट्र

निरा उजवा कालवा दुरुस्तीच्या नावाखाली फडणवीस यांचे माढा लोकसभा मतदार संघात खुनशी राजकारण…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाइल नंबर 9890299499

लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला आणि माढा लोकसभा मतदार संघात अभुतपुर्व “तुतारी” वाजल्याचे संकेत राजकीय तज्ञांनी दिल्या नंतर फौजदाराचे हवालदार झालेले खुनशी फडणवीस यांनी फलटण – माळशिरस – पंढरपूर – सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेला निरा कालवा बंद करून शेतकऱ्यांसह राजकारण करण्याचा प्रयत्न केला असल्याने फडणवीस यांचा खरा चेहरा जनते समोर आला आहे…

तरी हि भाजपा चे नेते अब की बार 400 पार म्हणत आहेत,आपल्या माढा लोकसभा मतदार संघाने तर सबंध महाराष्ट्रात भाजपा चे गणित बिघडवले याचे कारण भाजपा ने शोधले पाहिजे उगाच् लादलेल्या उमेदवाराला निवडून द्यायला इथली जनता मोकळी थोडी आहे आणि फडणवीस यांनी खुनशी वृत्तीने शेतकऱ्यांना त्रास देउन त्यांच्या सहनशक्ती ची परीक्षा घेऊ नये याचा फटका चौथ्या टप्प्याच्या मतदानावर झाल्या खेरीज राहणार नाही…

अशा खुनशी वृत्ती मुळेच मोदींची लाट जवळ जवळ ओसरली असुन भाजपा ने विकास कामे तर काहीही केले नाहीत,या उलट शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणण्याचे “महापाप” केले आहे…

शेतकऱ्यांसह मराठा आरक्षण,धनगर समाज आरक्षण हे विषय देखील योग्य पद्धतीने हाताळले नाहीत आणि याचाच फटका भाजपा ला चौथ्या टप्प्यात बसु शकतो हे कुणी नाकारू शकत नाही…

किरीट सोमय्या,गोपीचंद पडळकर,निलेश राणे,मोहीत कंबोज आणि चंद्रकांत पाटील हे प्रचारक म्हणून कुठे आहेत असा हि प्रश्न पडतो कारण ह्या सर्वांना शेतकऱ्यांचे काहीही देणे घेणे नसुन भाजपा फेकलेल्या तुकड्यावर गुजराण करणारी टोळी असे आता सिद्ध झाले आहे…

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून देखील खुनशी फडणवीस यांचे समाधान न झाल्याने सोलापूर लोकसभेत तर हिंदुत्व या विषयावर निवडणुक लढ्वली गेली तेंव्हा भाजपा सत्ते साठी काहीही करु शकते हे दिसुन आले…

मोदींच्या रूपाने गेली दहा वर्षे भाजपा सत्तेत असुन देखील विकास कामांवर निवडणुका होणे अपेक्षित असतानाच हिंदु मुस्लीम या विषयावर जर हे मते मागत असतील तर हे भाजपा साठीच घातक ठरू शकते कारण जनता आता हुशार झाली असुन भूलथापांना बळी पडणार नाही असे हि जनतेतून बोलले जात आहे…

एक वेळ भाजपा ने महाराष्ट्रात काँगेस वर बोलावे पण उबाठा वर बोलू च नये कारण शिवसैनिक आता पेटून उठला असुन 84 वर्षाचा एक तरुण संघर्ष योद्धा त्यांच्या बरोबर आहे…

तसेच पर राज्यातून आणलेल्या कुत्र्याला श्रीकांत भारतीय सारखा आमदार माणूस जर “शंभु” नाव ठेवत असेल तर भाजपा ने मराठा समाजाची मते ग्रहीत धरू नये आणि मराठा समाजाने देखील भाजपाच्या कुठ्ल्याही उमेदवारांना मतदान करू नये,असे जनतेचे प्रामाणिक मत आहे…

फडणवीस यांनी अशीच खुनशी प्रवृत्ती ठेवली तर महायुती च्या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात येणार आहे एवढे मात्र निश्चित खरे…
आणखी बरेच काही मुद्दे आहेत बोलाय सारखे तुर्तास इतकेच…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button