पालघर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा ॲडव्होकेट दीपक भाते यांची नियुक्ती तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट विनिता पाटील यांची निवड

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ॲडव्होकेट दीपक भाते तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट विनिता पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील पालघर बार असोसिएशनची सन 2024-25 ची वार्षिक निवडणूक गुरुवार दिनांक 09 मे 2024 रोजी पालघर येथे पार पडली या निवडणुकीमध्ये पालघर कोर्टातील 280 वकील सभासदांनी मतदान केले होते.
पालघर बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदासाठी झालेली तिरंगी निवडणूक लढतीमध्ये ज्येष्ठ ॲडव्होकेट दीपक भाते यांचा बहुमताने विजय झाला असल्या कारणामुळे त्यांची पुन्हा चौथ्यांदा पालघर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट विनिता पाटील यांची निवड करण्यात आली असून सचिव पदी ॲडव्होकेट चिन्मय राऊत तर सहसचिव पदी ॲडव्होकेट नितेश पावडे खजिनदारपदी ॲडव्होकेट धर्मसेन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. तर ग्रंथालय अध्यक्ष अध्यक्षपदी ॲडव्होकेट भावेश मोरे, ग्रंथालय सचिव ॲडव्होकेट विवेक पामाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पालघर बार असोसिएशनची पालघर बार अध्यक्ष पदाची झालेली ही तिरंगी निवडणूक अत्यंत चुरसीची झाली असून पालघर कोर्टातील वकिलांनी योग्य निर्णय घेऊन एका जेष्ठ जाणकर अनुभभी अशा ॲडव्होकेट दीपक भाते यांना निवडून देऊन त्यांना बहुमताने विजयी करून चौथ्यांदा पालघर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडून दिले आहे.



